Sangli Ganeshotsav : विद्यार्थ्यांच्या स्वकमाईचा ‘श्रीगणेशा’

‘शांतिनिकेतन’मध्ये उपक्रम : ‘कमवा-शिका’मधून बनविल्या २०० मूर्ती
sangali
sangali sakal

सांगली - कला शिकण्याचा व त्यातून कमाईचा ‘श्रीगणेशा’ घडून आलाय शांतिनिकेतनच्या कलाविश्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा. कमवा व शिका योजनेंतर्गत शिल्पकला विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेशमूर्तींना मागणी असून अवघ्या चार दिवसांतच २०० पैकी १३२ मूर्तींची आगाऊ नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणाऱ्या रकमेतून त्यांचे वार्षिक शुल्क अदा केले जातील.

कमवा-शिका योजनेतून पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बनविण्याची कल्पना शांतिनिकेतनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी मांडली. गरजू विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत साडेचार महिन्यांत २०० मूर्ती साकारल्या. यात साध्या बैठकीतील, तसेच आसनाला उंदरांनी वेढा घातलेल्या मूर्ती आहेत.

सुबकतेसह मूर्तींच्या डोळ्यांतील जिवंतपणामुळे त्या आणखी आकर्षक दिसत आहेत. फेट्यातील मूर्ती आणि ऑलिव्ह ग्रीन, ब्राऊन रंगात बाप्पा साकारले आहेत. १५ आणि १८ इंच उंचीच्या या मूर्ती आहेत. कलाशिक्षक सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनात राहुल बाबर, अभय भिसे, मयुरी कराळे, देवांश गुरव, वीणा शेगणे, रोहन कुंभार, ओंकार सुतार, रोहित पाटील, सिद्धेश पडियार, प्रथमेश पाटील यांनी मूर्ती साकारल्या. शांतिनिकेतनमधील शिपाई म्हणून काम करत असलेल्या नीलेश चव्हाण यांनी या मूर्तींसाठी देखणे असे बांधीव कोल्हापुरी फेटे तयारकेले आहेत.

sangali
Satara : बेडगच्या लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती खालावली

शिल्पकलेचा चार वर्षांचा कोर्स आहे. वार्षिक शुल्क १५ हजार रुपये आहे. बनविलेली मूर्ती ९०० रुपये किमतीची आहे. विक्रीतून येणाऱ्या रकमेतून विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क भरण्यात येईल. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत गणेशमूर्ती विक्रीला असल्याचेसांगितले आहे.

शुल्क भरायला अडचण होती. या उपक्रमामुळे ती दूर होईल. मूर्ती विक्रीतून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुटीत आणि कॉलेजच्या वेळेशिवाय हे काम पूर्ण केले.

राहुल बाबर, विद्यार्थी

sangali
Sangali Crime News : तरुणाची भर रस्त्यात हत्या, कूपवाडमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार

मला जी दुसऱ्या वर्षाची फी भरायला लागणार होती, ती या उपक्रमामुळे भरायची आवश्‍यकता राहिली नाही. प्रोत्साहनासमवेत एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव मिळाला. बनविलेल्या मूर्तीच आम्ही घरी बसवणार आहोत.

मयुरी कराळे, विद्यार्थिनी

sangali
Satara: "दंगलीतील दोषींवर कडक कारवाई करू" अजित पवारांनी घेतली शिकलगार कुटुंबाची भेट

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प होता. कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांनी सुबक मूर्ती बनविल्या आहेत. मुलांनी केलेले श्रम पाहिले आहे. त्यामुळे विक्रीआधीच कमाईची अंदाजित रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांच्या नावे जमा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर यंदा २०० मूर्ती साकारल्या. पुढच्या वर्षी ५०० मूर्ती साकारायचा मानस आहे.

गौतम पाटील, अध्यक्ष, शांतिनिकेतन, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com