

Sangli Ganpati Sansthan to Bring New Elephant From Assam After Bablu Death to Continue the Historic Religious Tradition
sakal
सांगली: सांगलीचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री गणपती पंचायतन संस्थानची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या बबलू हत्तीच्या निधनानंतर आता सांगलीकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘संस्थानच्या परंपरेचे वैभव अबाधित राखण्यासाठी आता आसाममधून नवीन हत्ती आणला जाणार आहे, ’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत केली.