esakal | पदवीधर निवडणुकीसाठी विश्वजित कदम-अरुण लाड एकत्र; आता ग्रामपंचायतसाठी काय करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

sangli gram panchayat election preparation arun lad and sangram deshmukh


पलूसला १४ ग्रामपंचायतींसाठी धूमशान ः देशमुख गट शहदेण्यासाठी रणनीती

पदवीधर निवडणुकीसाठी विश्वजित कदम-अरुण लाड एकत्र; आता ग्रामपंचायतसाठी काय करणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पलूस (सांगली) : पलूस तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या राजकीय  समीकरणाच्या पार्श्वभूमीवर कदम-लाड एकत्रितपणे ग्रामपंचायत निवडणुका लढवून देशमुख गटाला शह देण्यासाठी कोणती राजनीती आखणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पलूस तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या गावांची नावे व कंसात अनुक्रमे प्रभाग व सदस्य संख्या : आंधळी (४,११), भिलवडी (६,१७), भिलवडी स्टेशन (३,९),बुरुंगवाडी (३,९),दह्यारी (३,७), खंडोबाचीवाडी (३,९), मोराळे (३,९), नागराळे (४,११), नागठाणे (५,१५), रामानंदनगर (६,१७), सूर्यगाव (३,७), धनगाव (३,९), तुपारी (३’९), माळवाडी (५,१५). यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. काही ग्रामपंचायतीत भाजपा, राष्ट्रवादी तर काही ठिकाणी पक्ष विरहित स्थानिक राजकारणातील गटांकडे सत्ता आहे.
राजकारणात संवेदनशील तालुका म्हणून पलूस तालुक्‍याची ओळख आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा मोठ्या ईर्षेने लढवल्या जातात.


पलूस तालुक्‍यातील या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी राजकारणात विरोधक असणारे कदम-लाड गट एकत्र आले आहेत. काँग्रेसचे राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आपली सर्व ताकद आमदार अरुण लाड यांच्या पाठीमागे भक्कमपणे  उभी केली होती. विधानसभा निवडणुकीत आमदार लाड हे डॉ. कदम यांच्या प्रचारात होते. या कदम-लाड एकत्रीकरणामुळे पलूस तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख अर्थात भाजपा  या बदलत्या राजकीय परिस्थितीला कसे तोंड देणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी देशमुख - लाड यांच्या मध्ये १९९५ पासून  सख्य होत. कदम -लाड एकत्र येण्याचा आणि लाड व देशमुख यांच्यामध्ये निर्माण झालेल्या राजकीय दरीचा ग्रामपंचायत निवडणुकांवर काय परिणाम होणार? याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- थंड हवेच्या ठिकाणांसह, समुद्र किनारे गजबजले -

बदलते राजकीय समीकरण
विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने कदम-लाड एकत्र आले. नेहमी एकत्र असणारे लाड-देशमुख गट दुरावले. या बदलत्या राजकीय समीकरणाचा ग्रामपंचायत निवडणुकीत काय परिणाम होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपादन- अर्चना बनगे