Sangli Grampanchayat : ग्रामपंचायतींची ६३ टक्के वसुली; घरपट्टी ६३, तर पाणीपट्टी ६४ टक्के कर जमा
Tax Collection : सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी घरपट्टी आणि पाणीपट्टी करवसुलीत चांगली प्रगती केली आहे. मार्च महिन्यात करवसुलीला वेग आल्याने फेब्रुवारीअखेर एकूण मागणीपैकी सुमारे ६४ टक्के कर जमा झाला आहे.
सांगली : ग्रामपंचायतींचे हक्काचे उत्पन्न असलेल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी कराची वसुली मार्च महिन्यात जोरात सुरू आहे. फेब्रुवारीअखेर दोन्ही करांच्या एकूण उद्दिष्टापैकी सुमारे ६४ टक्के वसुली झाली आहे.