Sangli : वांगीचे होनमाने बंधू घडवत आहेत स्वःखर्चाने पैलवान; तालमीत देताहेत मल्लविद्येचे धडे

या तालमीतील रोहित होनमाने याने शालेय क्रिडा स्पर्धेतील जिल्हास्तरीय कुस्तीमध्ये ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक तर रोहन होनमाने याने ५० किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. याचबरोबर सह्याद्री साखर कारखान्याने घेतलेल्या मानधन कुस्ती स्पर्धेत विराज होनमाने याचा प्रथम क्रमांक येऊन तो दरमहा मानधनासाठी पात्र ठरला आहे.
sport
sportsakal

वांगी- कोरोना महामारीने जगाला अद्दल घडविली असताना वांगी (ता.कडेगांव) येथील होनमाने बंधूनी कोरोनाच्या "लॉकडाऊन" चा सदुपयोग करीत आपल्या घराजवळ तालीम बांधून होतकरु मुलांना कुस्तीकला शिकविण्याचा उचललेला विडा मूर्तरुप धारण करीत असल्याचे दिसू लागले आहे.

सदर तालीम सुरु करताना आपल्या फक्त मुलांनी कोरोना स्थितीत घराबाहेर न पडता केवळ व्यायाम करावा, एवढीच अपेक्षा ठेवली होती. मात्र या तालमीतील प्रशिक्षणाचा लौकिक पंचक्रोशीत सर्वदूर गेल्याने या तालमीत सध्या मुला-मुलींसह २७ पैलवान मल्लविद्येचे धडे गिरवीत आहेत.

sport
Pune: टेकड्यांच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेचीच - चंद्रकांत पाटील

वांगीचे रामभाऊ आणि राहुल नामदेव होनमाने हे बंधू विविध शेतीप्रयोगात सदैव रममाण असतात. उच्चतांत्रिक शेती करण्यात त्यांचा नावलौकिक आहे. तीन वर्षापूर्वी कोरोना च्या घाल्याने सारे जग स्तब्ध झाले होते. अशावेळी सर्व शैक्षणिक केंद्रे बंद झाली. परिणामी लहान मुलांच्या हातात "अॉनलाईन" शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल आला.

या मोबाईलचे विपरीत परिणाम बहुतेक पालक सध्या भोगत आहेत. याचवेळी होनमाने बंधूनी मोबाईलपासून किमान आपली मुले दूर रहावीत यासाठी शक्कल लढविली आणि घरातच तालीम सुरु केली. त्यावेळी मुले मोबाईलपासून परावृत्त होऊन त्यांना इतर छंद लागावा एवढीच माफक अपेक्षा होती. मात्र याचा अपेक्षित परिणाम होऊन त्यांची मुले व्यायामात कुशाग्र निघाली.

sport
Pune Mumbai Expressway : लेन कटिंग करणाऱ्या ३९११ वाहनांवर कारवाई

"मुलांचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीनुसार त्यांनी शेड बांधले व मातीचा आखाडा बनवून कुस्तीकला शिकविण्याचा श्रीगणेशा केला. यातही भरपूर व्यायामाच्या जोरावर त्यांची मुले लिलया कुस्ती करु लागली. तेव्हा त्यानी पलूस येथील नामांकित वस्ताद अमोल पवार यांची मानधनावर नेमणूक करुन मुलांना चांगले मल्ल बनविण्याचा ध्यास घेतला. या वस्तादांच्या हाताखाली आजच्या घडीला वांगीसह, शेळकबाव, देवराष्ट्रे या गावची मुले व मूली याठिकाणी कुस्तीकला शिकत आहेत.

सदर तालमीचे बांधकाम, त्यामध्ये मातीचा आखाडा बांधून लाल माती भरली आहे. शिवाय दुसऱ्या हॉलमध्ये भव्य मॕट बसविण्यात आले आहे. दररोज सायंकाळी अडीच तास या कुस्तीकेंद्रात सर्व मुलांकडून कसून सराव करुन घेतला जातो. यामधील प्रत्येक खेळाडू रोज किमान तासभर कुस्ती खेळतो व उरलेल्या वेळेत व्यायाम करुन घेतला जातो.

sport
Mumbai : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 चौरस फुटाचे घर द्या रामदास आठवले यांचा निवडणूक अजेंडा

याठिकाणी व्यायामाचे सर्व आधुनिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आजपर्यंत होनमाने बंधूनी या तालमीसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च केले आहेत. या कुस्तीकेंद्रातील पैलवान विविध ठिकाणी मैदाने गाजवित आहेत. हे कुस्तीकेंद्र वांगी ते देवराष्ट्रे रस्त्यालगत होनमाने बंधूंच्या घराशेजारी उभे असून तालमीत येणाऱ्या कुठल्याही मुलाकडून कसल्याही प्रकारची फी आकारली जात नाही.

दिवसेंदिवस या कुस्तीकेंद्राचा "डंका" सर्वदूर होत असून अशा प्रकारे पूर्णतः मोफत मल्लविद्या शिकविणारे राज्यातील एकमेव केंद्र असावे असे जुन्या-नव्या पैलवान मंडळीकडून बोलले जात आहे. सर्वच स्तरातून सदरची "रांगडी" कला उपेक्षित ठरत असताना होनमाने बंधूंचा प्रयोग अफलातून यशस्वी होत आहे. भविष्यात राज्यातील नामवंत मल्लांचे याठिकाणी मार्गदर्शन ठेवण्याचा या दोन बंधूंचा निश्चय आहे. त्यांच्या या उदात्त कामगिरीस कुस्तीप्रेमी "दुवा" देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com