
सांगली : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विश्रामबाग येथील बापट मळा (महावीर उद्यान) परिसरात ही घटना घडली. राम यल्लाप्पा शिंदे (वय ५२, वडर कॉलनी, सांगली) असे त्यांचे नाव आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याची शासकीय रुग्णालयात नोंद आहे.