Sangli Irwin Bridge road damage
esakal
सांगली : ‘आयर्विन’शेजारील पुलाचे उद्घाटन होऊन नऊ महिनेही झाले नाहीत, तोवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. सांगलीवाडीहून पुलावर येताच वळणावरच मोठमोठे खड्डे पडले (Sangli Irwin Bridge road damage) आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीचा प्रत्यय या माध्यमातून येत आहे.