Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
esakal
ईश्वरपूर (जि. सांगली) : प्रॉपर्टी कार्डावरील क्षेत्र दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाळवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक आणि मुख्यालय सहाय्यकास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ (ACB Action in Sangli) पकडले. सोनाली सचिन आवटी (वय ४७, रा. आष्टा) आणि सुनील गणपती पाटील (४८, रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.