Sangli Crime News
esakal
ईश्वरपूर (सांगली) : पोलिस कारवाईच्या भीतीने पळून गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. करण पांडुरंग मस्के (वय १७, मस्के मळा, वाघवाडी, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील पांडुरंग शिवाजी मस्के (वय ५६) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात (Ishwarpur Police Station) फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. १३) रात्री ही घटना घडली.