Sangli Market Yard jaggery adulteration news
esakal
सांगली : अन्न औषध प्रशासनाने मंगळवारी (ता. १८) वसंतदादा मार्केट यार्डात गुळातील भेसळीविरोधात कारवाई केली. गुळाच्या दर्जाबाबत संशय असल्याने सव्वाचार लाख रुपयांचा गूळ जप्त केला. गुळाचा दर्जा कमी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात (FDA raid on adulterated jaggery in Sangli) आली. गुळात भेसळीचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे. साखर नको म्हणून गूळ खाणाऱ्यांसाठी हा धोकाच आहे.