

Bribe for Panchayat Samiti election form
esakal
Talathi Bribery Caught Red Handed : पंचायत समितीच्या उमेदवारी अर्जासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला बुधवारी रंगेहाथ पकडले. सुभाष बाबासो पाटील (वय ५४, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.