सांगली : आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची ५२४ मीटरपर्यंत करण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचालींनंतर काल सांगलीतील लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची हाक दिली. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात याविरोधात जनमत उभारण्याचा निर्धार झाला. यात लोकप्रबोधनासह सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याबाबत निर्धार करण्यात आला. आजघडीला महाराष्ट्र सरकारसमोरील (Maharashtra Government) उपलब्ध पर्याय अतिशय मर्यादित आहेत.