Krishna River water shortage in Sangli district
esakal
भिलवडी (जि. सांगली) : ‘‘कोयनेचे पाणी देण्यापासून कोणी अडवत असेल तर गाठ माझ्याशी अडवत असेल; मग कुठलाही मंत्री असो गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा,’’ असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी येथे दिला. येथे कोरड्या पडलेल्या कृष्णेच्या नदीपात्राची पाहणी (Koyna dam water release latest news Sangli) केली. शुक्रवारी (ता. ३०) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोयना धरणाच्या पाण्यासंदर्भात कालवा समितीची महत्त्वाची बैठक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.