Koyna Dam water allocation dispute
esakal
सांगली : कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षाची आणि याचना करण्याची वेळ आली आहे, तरीही धरणातून पाणी सोडायला सातारा जिल्ह्यातील मंत्री विरोध करत (Koyna Dam water release for Sangli district) आहेत. टंचाई स्थितीत दरवेळी कोयना धरणातून पाण्यासाठी याचना करण्याची वेळ सांगलीकरांवर येते. कालवा समितीच्या आजच्या (ता. २९) बैठकीत पालकमंत्री, खासदार, आमदार याबाबत जाब विचारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.