

Sangli Hamal and Tolaiyar Protest Security Concerns Rise
sakal
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डातील मुख्यालयासमोर हमाल व तोलाईदारांनी आज विविध मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन केले. रविवारी (ता. २३) रात्री तोलाईदार कार्यालयाला लागून असलेल्या हमाल पंचायत संपर्क कार्यालयाला अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.