सांगली-मिरज रस्ता केला बंद...का? वाचा 

sangli-miraj road.jpg
sangli-miraj road.jpg
Updated on

सांगली- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील विजयनगर येथील एका बॅंक अधिकाऱ्याला "कोरोना' ची लागण झाल्यामुळे प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. विजयनगर परिसर पूर्णपणे "सील' करण्यात आला आहे. परिसरावर "ड्रोन' कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची करडी नजर भिरभिरत आहे. कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. सांगली-मिरज रस्ता बंद करण्यात आला असून कुपवाडमार्गे वाहतूक वळवली आहे. 


सांगलीतील गणपती पेठेतील एका बॅंकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याला "कोरोना' ची लागण झाल्याची माहिती आज पहाटे सर्वत्र समजली. त्यानंतर जिल्हा आणि पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील विजयनगर परिसरातील पर्ल हॉटेलच्या मागे संबंधित बॅंक अधिकारी राहतात. 17 एप्रिलपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास होऊ लागल्यामुळे ते मिरजेतील कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या "स्वॅब' च्या नमुन्याची मिरजेतील लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर अहवाल "पॉझिटीव्ह' आला. त्यानंतर आज सकाळपासून विजयनगरची प्रत्येक गल्ली बॅरिकेटस्‌ लावून "सील' करण्यात आली. तब्बल 51 ठिकाणी बॅरिकेटस्‌ लावून परिसर "सील' करण्यात आला आहे. 


सांगली-मिरज रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विजयनगर परिसर आहे. त्यामुळे पोलिसांनी सांगली-मिरज रस्ता पूर्ण बंद केला आहे. मिरजेकडून सांगलीत येणारा भारती हॉस्पिटल, विश्रामबाग चौक, विजयनगर रेल्वे ब्रिज, मराठा समाज कृष्णाली वसाहत, जिल्हा न्यायालय येथील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. सांगलीतून मिरजेकडे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी कुपवाडमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. विजयनगर परिसर पोलिसांच्या गराड्यात आहे. तसेच संपूर्ण परिसरावर "ड्रोन' कॅमेऱ्याची घरघर सुरू झाली आहे. परिसरात तीन शिफ्टमध्ये 24 तास पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. "सील' केलेल्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिका आरोग्य विभागामार्फत सर्व्हे सुरू केला आहे. 
 

""कोरोना रूग्ण आढळल्यामुळे विजयनगर परिसर "सील' केला आहे. तसेच यापूर्वी सांगलीतील 44 स्पॉट "लॉक' केले आहेत. नागरिकांनी स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्‍यात घालू नये. घरीच सुरक्षित राहा.'' 
-अशोक वीरकर (पोलिस उपाधीक्षक) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com