बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Mahesh Bondre's bull won 65 arenas, Thar, and tractors before sudden demise: आज सकाळी त्याच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला. सलाईन लावून उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी अचानकपणे हृयविकाराच्या धक्क्याने त्याची प्राणज्योत मालवली.
Bullet Chhabya bull death

Bullet Chhabya bull death

esakal

Updated on

Sangli Bullet Chhabya Bull Death: बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी अशी ओळख असलेला हरिपूर (ता.मिरज) येथील बुलेट छब्या बैलाचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्याचे मालक महेश बोंद्रे यांच्यासह संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर लोकांनी आज दुपारी अंत्यसंस्काराला उपस्थिती लावत त्याच्याप्रतीची मायेची भावना व्यक्त केली. बुलेट छब्याने आपल्या वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे ६५ मैदाने जिंकताना थार, ट्रॅक्टरसह लाखोंची बक्षिसे जिंकत हरिपूर गावचे नाव संपूर्ण राज्यात केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com