सांगली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 31 कोरोना पॉझिटिव्ह... 

घनशाम नवाथे
Friday, 17 July 2020

सांगली- महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 31 कोरोना "पॉझिटिव्ह' रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये सांगलीत 25 तर मिरजेत 6 रुग्ण सापडले आहेत. 

सांगली- महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 31 कोरोना "पॉझिटिव्ह' रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये सांगलीत 25 तर मिरजेत 6 रुग्ण सापडले आहेत. 

गेल्या आठ दिवसात सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. गुरूवारपर्यंत 221 रूग्ण होते. शुक्रवारी दिवसभर मनपा क्षेत्रात 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सांगलीत 25 रुग्ण सापडले असून एका काळी वाट परिसरात 14 रुग्ण कोरोना "पॉझिटिव्ह' सापडले आहेत. याचबरोबर मंगलमूर्ती कॉलनीतील एक होलसेल भाजी विक्रेता सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. याचबरोबर खणभाग लाळगे गल्ली, अभयनगर, गणेशनगर, अरीहंत कॉलनी या ठिकाणी सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

मिरजेत सुद्धा नदीवेस, कमानवेस आणि गोठण गल्ली परिसरात कोरोनाचे सहा रुग्ण सापडले असून या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेटी देत कंटेन्मेंट झोनबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या. सांगली काळी वाट परिसरात 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी तातडीने भेट देत आरोग्य विषयक सूचना केल्या. मनपाचे गटनेते युवराज बावडेकर, सहायक आयुक्त सहदेव कावडे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, धनंजय कांबळे आदी उपस्थित होते. या परिसरात वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांच्यासह आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनीही आपला वैद्यकीय सर्व्हे सुरू केला आहे. यावेळी नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत नसल्यानेच मनपा क्षेत्रात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचे पालन करावे तरच आपण कोरोनाला रोखू शकतो असे आवाहन मनपा आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Municipal Corporation area on Friday 31 corona positive ...