
Sangli Municipal Corporation wards remain unchanged; objections and suggestions open till September 15.
esakal
सांगली: आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकांसाठी आज महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचनेची प्रारूप यादी जाहीर झाली. महापालिकेच्या मुख्यालयासह तीनही विभागीय कार्यालयांमध्ये प्रारूप यादी पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. याआधीच्या निवडणुकीवेळचीच ९९ टक्के रचना कायम ठेवली आहे. यावर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना देण्यासाठी मुदत आहे.