सांगली महापालिका सुरु करणार नॉन कोविड हॉस्पिटल  

बलराज पवार
Thursday, 10 September 2020

सांगली : महापालिका क्षेत्रात नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास खासगी डॉक्‍टर टाळाटाळ करत आहेत.

सांगली : महापालिका क्षेत्रात नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास खासगी डॉक्‍टर टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या रुग्णांचे हाल होत आहेत. आता यावर महापालिकेनेच नॉन कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कुपवाड शहरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक एकमध्ये येत्या दोन दिवसात सर्व आजारांवर तपासणी आणि उपचाराची सोय करणार असल्याचे आयुक्त नितीन कापडनीस यांनी सांगितले. 

महापालिकेत झालेल्या बैठकीत श्री. कापडनीस म्हणाले, कोरोनाचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना केअर सेंटर, कोरोना हॉस्पिटल सुरु केली आहेत. मात्र यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार होत नाहीत अशी स्थिती आहे. खासगी डॉक्‍टरही कोरोनाच्या भीतीने उपचार टाळत आहेत. 

ते म्हणाले, महापौर गीता सुतार तसेच पदाधिकारी, सदस्यांशी चर्चा करून महापालिकेच्या वतीने शाळा क्रमांक एकमध्ये तात्पुरते नॉनकोविड हॉस्पिटल सुरू करणार आहे. खासगी तसेच महापालिकेच्या डॉक्‍टरांची तेथे नियुक्ती असेल. तेथे महापालिकेमार्फत अँटीजेन चाचणी, तपासण्या आणि औषधोपचार केले जाणार आहेत.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Municipal Corporation will start Non Covid Hospital