Sangli Politics
esakal
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढू. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही लोकांसमोर जाऊ आणि ही निवडणूक जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.