

Mayor Candidates Across Sangli
sakal
सांगली: जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या २८ आणि नगरसेवकपदाच्या ३४७ अशा एकूण ३७५ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आठ नगराध्यक्षपदांसाठी ४१ तर नगरसेवकपदासाठी ५९४ उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.