सांगली महापालिकेतील फसवणूक प्रकरणाचा तपास प्रलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli muncipal corporation

सांगली महापालिकेतील फसवणूक प्रकरणाचा तपास प्रलंबित

सांगली : महापालिके-तील फसवणूक प्रकरणी केलेली तक्रार आणि शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी थेट गृहविभागाकडे केली.

गृह विभागाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, महापालिका आरोग्य विभाग व मालमत्ता विभागातील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करावा, यासाठी ५ व ६ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्याकडे लेखी तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल करणे अभिप्रेत आहे. एप्रिलपर्यंत पोलिसांकडे वारंवार चौकशी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी अथवा कायदेशीर कारवाई केली नव्हती. तसेच ‘डॉग युनिट’मधील भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील याच अधिकाऱ्याकडे असताना त्यांनी संशयितांना अटक केली नाही.

दोन्ही तक्रारींवर कार्यवाही न झाल्याने माहिती-अधिकार अधिनियमानुसार माहिती मागवली. ३० दिवसांत त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे प्रथम अपील दाखल केले. शोधाशोध करून तब्बल तीन महिन्यांनी उत्तर दिले. संबंधित दोन पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी न करता आयुक्तांना कळवले आहे, असे सांगितले. वास्तविक, कायद्याने तक्रारदारांकडे पत्रव्यवहार करून पुरावे मागणे व तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करणे अभिप्रेत आहे. परंतु दोघा अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर उपाधीक्षकांकडे ती वर्ग केली जाते. परंतु तेथेही तक्रार प्रलंबित ठेवली. या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या भ्रष्टाचार करणाऱ्या, गैरकारभार करणाऱ्या आणि कागदपत्रांचा गैरवापर करून जनतेला फसवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकारी पाठीशी घालत असल्याचा संशय येतो. पोलिस अधिकारी कायद्याप्रमाणे काम करत नसून कायदा मोडत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Sangli Municipal Investigation Pending

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top