माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

मैत्रिणीची दुचाकी ताकारी (ता. वाळवा) येथील नदीपत्रात आढळून आली आहे. या घटनेमुळे बोरगाव आणि ईश्‍वरपूर परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित तरूण हा ईश्‍वरपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आर्थिक वादातून हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
Sangli police shocked as man confesses to killing girlfriend and dumping her body in a river.

Sangli police shocked as man confesses to killing girlfriend and dumping her body in a river.

Sakal

Updated on

ईश्‍वरपूर: किरकोळ वादातून मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचे सांगत एक तरूण ईश्‍वरपूर पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याच्या या माहितीने पोलिस यंत्रणा हदरून गेली. त्याच्या माहितीनुसार रेस्क्यू पथकाच्या मदतीने पोलिसांनी तातडीने मृतदेह शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात सुरूवात झाली. सायंकाळी उशीरा मिळालेल्या माहितीनुसार त्या मैत्रिणीची दुचाकी ताकारी (ता. वाळवा) येथील नदीपत्रात आढळून आली आहे. या घटनेमुळे बोरगाव आणि ईश्‍वरपूर परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित तरूण हा ईश्‍वरपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आर्थिक वादातून हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com