Sangli News
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli News : ट्रक चालकाचा एकच प्याला, महामार्ग मात्र ब्लॉक झाला! मद्यधुंद चालकाला वाहनधारकांसह युवकांनी धू-धू धुतलं
Drunk Truck Driver Creates Chaos on Asian Highway Near Nerle : नेर्ले येथे मद्यधुंद ट्रकचालकाने आशियाई महामार्गावर धिंगाणा घालून दोन वाहनांना धडक दिली. कुटुंब सुखरूप बचावले असून वाहतूक कोंडी झाली.
नेर्ले (सांगली) : आशियाई महामार्गावर रात्री ८ च्या सुमारास कराडच्या दिशेला जेवण हॉटेल व झुंझार हॉटेल समोर एका मद्यधुंद चालकाने (Drunk Truck Driver) बेफामपणे ट्रक चालवत महामार्गावर (Highway) धिंगाणा घातला. त्याच्या दारू पिण्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यावेळी कोल्हापूर येथील एका चारचाकीला धडक दिली.
