Library Activities : पुस्तकपेढी उपक्रमातून नववर्षाचे केले स्वागत; शिराळा, शाहूवाडी तालुक्यात जपली वाचनसंस्कृती
Sangli News : बदलत्या परिस्थितीत व माहिती-तंत्रज्ञान युगात वाचनसंस्कृती विसरून चालणार नाही. वाचनाने व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनते. जिथे वाचन होते, तिथे विचार होतात. हेच विचार आपल्याला ध्येय ठरवायला, गाठायला मदतही करतात.
कोकरूड : ‘वाचनाचा लळा, फुलवी जीवनाचा मळा’ ज्ञानग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. बदलत्या परिस्थितीत व माहिती-तंत्रज्ञान युगात वाचनसंस्कृती विसरून चालणार नाही.