सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील वीज जोडणीला १५८ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सांगली -  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१७ अखेर प्रलंबित १६ हजार शेती पंपांना विद्युतजोडण्या देण्यासाठी १५८.८२ कोटी रुपये अनुदान देण्यात येईल. या सर्व जोडण्या जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सांगली -  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१७ अखेर प्रलंबित १६ हजार शेती पंपांना विद्युतजोडण्या देण्यासाठी १५८.८२ कोटी रुपये अनुदान देण्यात येईल. या सर्व जोडण्या जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

याबाबत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, अनिल बाबर यांनी ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्याकडे लेखी निधीची मागणी केली होती. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रलंबित शेती पंप जोडणी त्वरित पूर्ण करा, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात पश्‍चिम महाराष्ट्राच्या आमदारांनी लावून धरली होती. प्रलंबित शेतीपंप जोडणीबाबत ऊर्जामंत्री  श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरला एमएसईबीच्या बिजली हाऊस येथे बैठक झाली. 
बैठकीत सांगली जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१७ अखेर प्रलंबित असलेल्या १६ हजार ७३ शेती पंप जोडण्या प्रलंबित असल्याबाबत चर्चा झाली. ही शेती पंप जोडणी कामे पूर्ण करण्यासाठी पायाभूत आराखड्याची आवश्‍यकता असून याकरिता लागणारा निधी अंदाजे १५८.८२ कोटी मिळावा अशी मागणी आमदारांनी केली. या सर्व जोडण्या जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी बैठकीत दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार सुरेश हाळवणकर, अमल  महाडिक, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, प्रकाश अाबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, श्रीमती संध्यादेवी कुपेकर तसेच कोकणातील आमदार वैभव नाईक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli news 158 cores to electric connection