तुरीला 5400 रुपये दर योग्यच - हंसराज अहिर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सांगली - कृषी प्रधान देशात डाळी, तेलबियांची आयात हे आपले अपयशाचे लक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून देशात डाळीचे उच्चांकी उत्पादन घेतले. केंद्र सरकारने तुरडाळ निर्यातीचा क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. केंद्राने प्रतिक्विटलला दिलेला 5 हजार 400 रुपये हमीभाव कमी होत नाही. त्यावर टीका करणारे यापूर्वी 1600, 1700, 2300 रुपये दर देत होते, असे मत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे व्यक्त केले.

सांगली - कृषी प्रधान देशात डाळी, तेलबियांची आयात करणे हे आपले अपयशाचे लक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून देशात डाळीचे उच्चांकी उत्पादन घेतले. केंद्र सरकारने तुरडाळ निर्यातीचा क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. केंद्राने प्रतिक्विटलला दिलेला 5 हजार 400 रुपये हमीभाव योग्यच आहे. त्यावर टीका करणारे यापूर्वी 1600, 1700, 2300 रुपये दर देत होते, असे मत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे व्यक्त केले.

सांगली बाजार समितीतील एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. आता शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादन घेवून कोट्यवधीचे परकिय चलन वाचवावे,

- हंसराज अहिर

ते म्हणाले,"" सहकारात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सांगली बाजार समितीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते आहे. बाजार समित्यांचा थेट शेतकऱ्यांशी सबंध येतो. ऑनलाईन व्यवहार सुरु झाले आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशातील जनतेने प्रतिसाद देवून डाळ उत्पादन केले. 200 रुपये किलोंनी होणारी आयात थांबली. आता तुरडाळ निर्यातीचा क्रांतीकारक निर्णय घेतला. माझ्या यवतमाळ जिल्ह्यात चालू वर्षी एकूण पिकांच्या 83 टक्के तुरीचे उत्पादन घेतले. शेतकऱ्यांना मी जमिनी न विकरण्याचे आव्हान केलेच. शिवाय अनेक व्यवहार
त्यासाठी मोडले. अडचणीत आणलेल्यांनाही मी थांबवले आहे. खरच शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यवतमाळचे खासदार म्हणून शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न पुसण्याचा प्रयत्न आहे.''

Web Title: Sangli News Hansarj Ahir comment