विटा येथील साहित्य संमेलनात रंगले कविसंमेलन

विटा येथील साहित्य संमेलनात रंगले कविसंमेलन

विटा - झुंजावयास आम्हास आपसात लावून 
स्वार्थास साधणारे ते लोक कोण होते
माणूस मारणारे ते लोक कोण होते ?
मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते ?
सत्यास गाढणारे ते लोक कोण होते ?"
    अशा शब्दांत कविसंमेलनाध्यक्ष गझलकार डॉ. 
अविनाश सांगोलेकर यांनी सामाजिक विषमतेवर भाष्य केले.
     

येथील साहित्य सेवा मंडळ, भारतमाता ज्ञानपीठ आणि राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या 36 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कविसंमेलनात स्त्रीभ्रूण हत्या, महागाई, आरक्षण,  राष्ट्रीय एकात्मता, राजकारण यासारख्या अनेक ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या अनेक कविता सादर केल्या. त्यामुळे 'सुवर्णनगरी'त कविमय झाली होती.

गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अँड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.       

यावेळी झालेल्या कवीसंमेलनात शि. म. जाधव, अल्ताफ मुजावर, नितीन गवळी, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. दीपाली घाडगे, भीमराव कुंभार, निशा वायदंडे, संजय नायकवडी, बाबुराव शेळके, सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपूजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला  होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, बबूताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दिपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवे, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, निशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, चंद्रकांत देशमुखे, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चंद्रवर्धन लांडगे, प्रभाकर पाटील यांनी कविता सादर केल्या.     

प्रास्ताविक योगेश्वर मेटकरी यांनी, तर स्वागत रघुराज मेटकरी यांनी केले. आभार डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com