बत्तीस मण सोन्याचे सिंहासन ही संभाजी भिडेंकडून फसवणूकच - गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

सांगली - रायगडावर होळीच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सोन्याची छत्री बसवण्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली होती, ती पूर्ण झाली नाही. आता कोणताही ऐतिहासिक आधार नसलेले बत्तीस मण सोन्याचे सिंहासन रायगडावर बसवण्याची घोषणा म्हणजे समाजाची फसवणूक व दिशाभूल आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सांगली - रायगडावर होळीच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सोन्याची छत्री बसवण्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली होती, ती पूर्ण झाली नाही. आता कोणताही ऐतिहासिक आधार नसलेले बत्तीस मण सोन्याचे सिंहासन रायगडावर बसवण्याची घोषणा म्हणजे समाजाची फसवणूक व दिशाभूल आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, ""कोरेगाव-भीमा जातीय दंगल सरकार प्रायोजक असलेला गुन्हा आहे. भिडे आणि एकबोटे यांना याप्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेतून जावेच लागेल. भिडे सध्या सामाजिक वातावरण बिघडून टाकण्याचे काम करत आहेत. घटनेला नाकारून मनुस्मृतीचा पुरस्कार करताहेत. त्यांच्याबाबतीत सरकारचे धोरण नेमके काय, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा फेल गेला आहे. त्यामुळे भविष्यात राम मंदिरचा मुद्दा किंवा पाकिस्तानशी युद्ध, नाहीतर धार्मिक दंगली घडवल्या जातील. सरकारचा कौशल्य विकासाचा मुद्दाही अपयशी ठरला आहे. सध्या चांगले व मोफत शिक्षण, सुरक्षितता आणि शांततेची गरज आहे.'' 

श्री. गायकवाड म्हणाले, ""बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनाला कोणताच ऐतिहासिक आधार नाही. भिडे यांनी होळीच्या मैदानावरील पुतळ्यावर सोन्याची छत्री बसवण्याची घोषणा केली, ती बसवली नाही. आता बत्तीस मण सोन्याचे सिंहासन काय बसवणार? शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे होते. त्यांच्यासाठी सोन्याच्या सिंहासनाचा अट्टाहास कशासाठी? महाराजांचा विचार महत्वाचा की सिंहासन, हे ठरवले पाहिजे. संभाजी ब्रिगेड याला विरोध करेल. लोकांचा पैसा गोळा होत असल्यामुळे सरकारचे देखील याकडे लक्ष हवे.'' 

"पेशवाई' अस्वस्थ 

ते म्हणाले, ""कोरेगाव-भीमा दंगलीनंतर नक्षली चळवळीशी त्याचा संबंध जोडणे संतापजनक आहे. सर्व पुरोगामी तेथे होते. नक्षली तेथे कशाला येतील? त्यांचे आंदोलन त्यांच्या ठिकाणी सुरू आहे. या प्रकरणात प्रदीप रावत यांच्या वैयक्तिक अहवालाची सरकार अंमलबजावणी करत आहे. सरकारी अहवालाची अंमलबजावणी कोण करणार? सरकार "पेशवाई' आहे. कोरेगाव-भीमामध्ये पेशवाईच्या पराभवाचा उत्सव होत असल्यामुळे तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Pravin Gayakwad comment