वाळवा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच; कुंडलवाडीत चोरी

विजय पाटील
बुधवार, 30 मे 2018

 सांगली - वाळवा तालुक्यात चोरट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. कुंडलवाडी येथे काल रात्री चोरीची घटना घडली. तब्बल 8 ते 10 चोरट्यानी घराच्या दरवाज्यावर दगड मारून आतमध्ये प्रवेश केला व धाक दाखवत अडीच तोळे सोन्याची चोरी केली.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सूर्यवंशी मळयात प्रकाश सूर्यवंशी यांच्या घराचा दरवाजा दगड घालून चोरट्यांनी फोडला.   दरवाजा फोडून घरात प्रवेश करुन अंदाजे दहा चोरट्यांनी प्रकाश सूर्यवंशी व त्यांची पत्नी जयश्री  याना मारहाण केली. जयश्री यांच्या कडील अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरले. तसेच घरातील तिजोरी कपाट विस्कटून चोरी केली आहे. हा प्रकार घडत असताना चोरट्यांनी शेजारील घरांना बाहेरून कडी लावण्यात आली होती.  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.. 

Web Title: Sangli News robbery incidence in Walava Taluka