सुभाष देशमुख ‘मालकमंत्री’ नव्हेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सांगली - सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मालकमंत्री व्हायचा प्रयत्न करू नये. तो आम्ही खपवून घेणार नाही. सांगलीवर अन्याय करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास त्यांना सोलापुरातून सांगलीत येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

एमआयडीसी कार्यालय सोलापूरला नेण्याचा प्रयत्न  म्हणजे सांगलीला सावत्रपणाची वागणूक देणे होते. शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही तो विषय हाणून पाडला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले,‘‘सुभाष देसाई यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसाठी चार कोटींचा निधी दिला. लागेल ती मदत देतो अशी ग्वाही दिली. एमआयडीसी कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे आमची धडपड सुरू असताना हे कार्यालयच सोलापूरला नेण्याचा घाट घातला होता. उद्योजक आमच्याकडे आले. उद्योगमंत्र्यांकडे दुसरे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार गेले. विषय समजावून सांगितले. मी फोनवरून बोललो. त्यांनी बैठक रद्द केलीच, शिवाय कार्यालय हलणार नाही, असे जाहीर केले. त्यावर देशमुख म्हणतात, मध्य काढू... काढा, पण तो सोलापुरात. इकडे नको. त्यांना सोलापूरचे एवढे प्रेम असेल तर त्यांनी तिकडचे पालकमंत्रिपद घ्यावे.  सांगलीवर अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.’’

कृष्णा व्हॅली चेंबरचे नेते शिवाजी पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले. हे कार्यालय कुठल्याही स्थितीत हालता कामा नये, यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य मिळाले.’’ सांगली-मिरज मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय खांबे म्हणाले,‘‘संजय विभूते यांच्यामार्फत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले. उद्योगावरील मोठे संकट टळले.’’ 

एमआयडीसीचे अतुल पाटील, गणेश निकम, शिवाजी पाटील, पांडुरंग रुपनूर आदी उपस्थित होते. 

चंद्रकांतदादा काम कुठाय? 
संजय विभूते म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांवर खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा केली होती. काय स्थिती आहे? आता कर्जमाफीला अर्ज केलेले दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे ते सांगताहेत. त्यांनी नावे जाहीर करावीत, अन्यथा हे सरकार बोगस आहे, असे तरी जाहीर करावे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news subhash deshmuk