सांगलीकर वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या प्रतिनिधीत्व करत आहेत. 27 ते 29 मे अखेर दिल्लीत अंतिम स्पर्धा होत आहे. 

बापट बालविद्यामंदिरमध्ये प्राथमिक शिक्षण, ग. रा. पुरोहितमध्ये माध्यमिक आणि कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. "व्हीजेटीआय' मुंबईतून पदव्युत्तर पदवी तर अमेरिकेत जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले.

सध्या बेंगलोरमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत त्या सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. बेंगलोरची सून झालेल्या वैशाली यांनी सामाजिक कार्यालाही वाहून घेतले आहे. नऊ स्वयंसेवी संस्थाबरोबर त्या शासकीय शाळा, स्थलांतरीत मुले, अनाथआश्रम, पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण, रक्त संकलन आदी उपक्रमात त्या सहभागी आहेत. शालेय जीवनात विविध स्पर्धात शंभरहून अधिक बक्षिसे पटकावली. क्रीडाक्षेत्रात वैयक्तिक व सांघिक खेळात 28 ट्रॉफी आणि पदके मिळवली.

त्यांना मॉडेलिंगची देखील आवड आहे. 2016 मध्ये "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावला. "मिसेस इंडिया वर्ल्डवाईड' मध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. "व्हीएतनाम' मधील अंतिम फेरीत वैयक्तिक अडचणीमुळे उतरल्या नाहीत. कर्नाटकातील मानाच्या सौंदर्य स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रॅन्डेड कंपन्यांच्या जाहिरातीची दालने त्यांना खुली आहेत. 

देशातील मानाच्या "मिसेस इंडिया' स्पर्धेत अंतिम 30 स्पर्धकांमध्ये त्यांची निवड सांगलीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. "करीअर' बरोबर मॉडेलिंगमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या वैशाली "मिसेस इंडिया' चा मुकूट पटकावण्यासाठी सज्ज आहेत. फेसबुक आणि "यूट्यूब' वरील पेज ला "लाईक' करण्याचे आवाहन त्यांनी "सकाळ' शी बोलताना केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Vaishali Pawar Misses India