नापास होण्याच्या भीतीने युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

विजय पाटील
बुधवार, 30 मे 2018

सांगली - मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने एका युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. प्रणव दूषयन्त माने (वय 18) असे मृताचे नाव आहे.

सांगली - मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने एका युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. प्रणव दूषयन्त माने (वय 18) असे मृताचे नाव आहे.

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तो आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ यांच्यासोबत राहत होता. मृत प्रणव सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात बारावीत वाणिज्य शाखेत शिकत होता. आज बारावीचा ऑनलाईन निकाल होता. निकालापूर्वीच प्रणव सकाळी साडेआठच्या सुमारास घरातून गेला होता. साडेनऊच्या सुमारास कर्नाळ- बिसूर दरम्यान रेल्वेखाली उडी मारून त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे कर्नाळ गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Sangli News youngster suicide incidence in Karnal

टॅग्स