
- ॲड. अरविंद देशमुख, तत्कालीन जिल्हा सरकारी वकील
(शब्दांकन : शैलेश पेटकर)
‘ती’ निरागस चिमुकली...घरात पहिली म्हणून सर्वांची लाडकी... शेजाऱ्यांचाही तिला चांगलाच लळा... मात्र अचानक तिचा घात झाला... कुटुंब कोलमडलं...अखेर ‘खाकी वर्दी’ने तपासाचे कौशल्य पणाला लावून प्रकरणाचा छडा लावला. शेजारील एका नराधमाने तिच्यावर अनन्वित अत्याचार करून तिचा गळा घोटला होता... नराधम हा अल्पवयीन... त्यामुळे कायद्याच्याही पेचात हा खटला अडकला. यावेळी निर्भया प्रकरणाचा दाखला उपयोगी आला अन् अल्पवयीन असूनही तो कायद्यातील बदलेल्या तरतुदीमुळे त्याच्या क्रूर कृत्याची शिक्षा मिळाली. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ तरतुदीनुसार देशातील पहिली शिक्षा सांगलीत सुनावली गेली.