
सांगली : माहेरहून सोने आणि पैसे आणावेत म्हणून होत असलेल्या मरहाणीला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. पती अजय नामदेव सूर्यवंशी, सासू अनिता नामदेव सूर्यवंशी, सासरा नामदेव विठ्ठल सूर्यवंशी आणि दीर अक्षय नामदेव सूर्यवंशी (सर्व विठ्ठल रुक्मिणी निवास, वसंतदादा साखरकारखान्यासमोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.