सांगली: सांगलीतील नशाबाजाराला पोलिसांनी आणखी मोठा दणका दिला आहे. शहरातील मध्यवर्ती पत्रकार नगर भागात छापेमारी करत नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. एक दोन नव्हे तर तब्बल ५५८ इंजेक्शन्सचा साठा जप्त केला. त्याची बाजारातील किंमत दोन लाख १५ हजार २३६ रुपये आहे. सहा जणांच्या टोळीवर एलसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली.