
Nepalese Thieves Arrested : कर्नाटकातील निकसे (जि. चिक्कमंगळूर) येथे घरफोडी करून विटा हद्दीतून भिवघाट - विजापूर रस्त्याने चारचाकीतून जाणाऱ्या नेपाळमधील तीन चोरट्यांना विटा पोलिसांनी पकडले. राजेंद्र शेर बम (वय ३०), एकेंद्र कटक बडवाल (३१) व करणसिंह बहादूर धामी (३४, धनगेडी, जि. कैलाली, नेपाळ) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील १ कोटी ४५ लाख ३ हजार १६५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व ५ लाखांची चारचाकी असा १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.
२० ते २१ ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची फिर्याद निकसे येथील शिवमूर्ती शेषाप्पा गौडा (५०) यांनी कोप्पा पोलिस ठाण्यात (कर्नाटक) गुरुवारी (ता. २१) दिली होती.