
सांगली: शहरातील भाजी मंडई परिसरातून मंगळवारी (ता. २९) रात्री २३ गाढवे चोरून नेण्यात आली. आंध्र प्रदेशमधील टोळीने ही गाढवे चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहर पोलिसांचे एक पथक चोरट्यांच्या मागावर आहे. गाढवाची चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने मालकांत भीतीचे वातावरण आहे.