आता आपल्या तक्रारी सांगा थेट एसपींना; येथे घेतली जाईल तुमच्या तक्रारीची दखल

sangli police innovation
sangli police innovation
Updated on

सांगली ः कुणाचा जमिनीचा वाद, तर कुणावर दाखल झालेली फिर्याद असो...आजी-आजोबांच्या तक्रारींची न घेतलेली दखल असो... दाद मागायची कुठं? प्रत्येकाला पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचता येत नाही. यासाठी खास सुविधा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेवटच टोक असणारे उमदी, कोकरूडच्या नागरिकांना आज थेट पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्याकडे गाऱ्हाणी मांडता आली. "नमस्कार, मी एसपी बोलतोय', हे वाक्‍य ऐकल्यानंतर तक्रारदारांना थोडा धीर येत होता. मात्र, श्री. शर्मा यांनी त्यांच्या तक्रारींची दखल घेवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिल्याने तक्रारदारास मोठा दिलासा यानिमित्ताने मिळाला. 

<

>

राज्यात प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्स्‌द्वारे तक्रार निवारण करणारी यंत्रणा सांगलीत पोलिसांनी बसवली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ही सुविधा करण्यात आली असून याचा आढावा घेत आहे. यानिमित्त पोलिस दल "टेक्‍नोसॅव्ही' बनत चालले आहे. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात ऐंशीहुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांसह संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीच्या कक्षेत आली. त्यामुळे गेल्या वर्षात 27 गुन्हे उघडकीस आले असून 29 आरोपींना जेरबंद करण्यात आले. तसेच विस्कळीत वाहतूकीलाही शिस्त लागण्यात आली. या वर्षात आणखी 57 कॅमेरा वाढविण्यात आले आहे. तसेच पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी "ऍप' तयार करण्यात आले. आता नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स्‌ची सोय करण्यात आली. 

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवस असतो. त्याठिकाणी अनेकजण तक्रारी घेवून येतात. प्रत्येक तक्रारदारास पोलिस अधीक्षकांनी आपली दखल घ्यावी, अशी इच्छा असते. मात्र, जिल्ह्यातील प्रत्येकांनी सांगलीत येवून पोलिस अधीक्षकांची भेट घेणे शक्‍य नाही. म्हणूनच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यासह अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, उपाधीक्षक कार्यालय, एलसीबीतही सोय करण्यात आली आहे. याद्वारे आता गुन्हेगारीचा आढावाही घेतला जाणार आहे. 

आंध्रनंतर महाराष्ट्रात प्रथमच 
आंध्र प्रदेशमधील प्रकासम या जिल्ह्यातील ही सुविधा आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी याची माहिती घेण्यासाठी उपनिरीक्षक डी. एस. विटेकरी, सायबर शाखेचे संदीप नलावडे, प्रकार पाटील यांना पाठविले. त्याच धर्तीवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध करण्यात 

परदेशातील तक्रारदारांनाही सोय 
परदेशातील तसेच परराज्यातील तक्रारदारांनाही याचा सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सायबर शाखेकडून लिंक प्राप्त झाल्यानंतर थेट एसपींशी संवाद साधता येणार आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com