
सांगली : येथील संजयनगर परिसरात जादा दराने गांजा विक्रीसाठी येणाऱ्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. सलमान कमरूद्दीन मुल्ला (वय ३२, राजीवनगर, जुना कुपवाड रस्ता, संजयनगर) असे त्याचे नावे आहे. त्याच्याकडून २२ हजार रुपयांचा एक किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.