Sangli Crime
esakal
सांगली : जिल्ह्यातील पोलिसांना (Police) स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडी कॅन्टीन’ मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश भीमराव चांदणे (वय ४२, अयोध्यानगर, संजयनगर, सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस कल्याण शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.