
सांगली : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या दीड हजार इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून सांगली शहरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. नशेखोरांचे धाबे दणाणले असून, दलाल गायब झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मेफेनटर्माईन इंजेक्शन, गोळ्या साठा व विक्री करणाऱ्या तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.