
सांगली : जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. १७८ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडली गेली. त्यापैकी ९ जणांना नियुक्तीच्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बदली ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.