सांगली पोलिस देणार संचारबंदी काळात प्रवासाचा ऑनलाईन परवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली  : कोरोना साथीमुळे जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे सामान्य माणसांसमोर अत्यावश्‍यक कामांसाठी बाहेर पडतेवेळी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठीचे कागदोपत्री सोपस्कर कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अर्थात ही सुविधा संचार बंदी काळात अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीच असेल. त्यासाठी पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयास करावयाचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध असेल. हा अर्ज फक्त सांगलीतुन बाहेर जाण्यासाठीच असेल. त्यासाठीची लिंक अशी ः https://bit.ly/SPofficeform

सदर अर्जासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणारे संगणक तंत्रज्ञ दिनेश कुडचे म्हणाले,"" सध्या असा ऑनलाईन अर्ज द्यायची सुविधा मुंबई पोलिस आणि सांगली पोलिसांकडेच आहे. अशाच पध्दतीने अनेक अत्यावश्‍यक कामांसाठी संचारबंदी काळात सुविधा राबवता येतील. पुढील पंधरा वीस दिवसात जीवनावश्‍यक सुविधा पुर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक लागतील. त्यांना परवाने देताना त्यांची महापालिका किंवा शासकीय कार्यालयात गर्दी करता कामा नये. निवडक अशा स्वयंसेवकांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी असे ऑनलाईन परवाने देणे शक्‍य आहे. त्यासाठी महापालिका तसेच सर्वच शासकीय यंत्रणांसाठी सांगली पोलिसांप्रमाणेच आम्ही सहकार्य देऊ.''
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Police will issue travel license online during the blockad