Sangli Politics BJP MLA Sudhir Gadgilesakal
पश्चिम महाराष्ट्र
आमदार गाडगीळांच्या धक्कातंत्राने सगळेच बुचकळ्यात; MS धोनीने जशी योग्यवेळी निवृत्ती स्वीकारली, त्याच स्टाईलने सुधीरदादांनी...
Sangli Politics BJP MLA Sudhir Gadgil : सुधीरदादांचा निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेश, हाही सांगलीसाठी धक्का होता.
Summary
क्रिकेटमधून महेंद्रसिंह धोनी याने जशी योग्यवेळी, एका उंचीवर असताना निवृत्ती स्वीकारली आणि त्याआधी नवं नेतृत्व तयार करण्याची जबाबदारीही पेलली, त्याच स्टाईलने सुधीरदादांनी धक्का दिला.
Sangli Politics : संत कबीरांचा एक दोहा आहे. तो असा - ‘ऐसी वाणी बोलीए, कोई ना कहे चुप । ऐसी जगह बैठीए, कोई ना बोले उठ।।’ आमदार सुधीर गाडगीळ यांचा स्वभाव आणि त्यांनी काल घेतलेला निर्णय या दोह्यासारखा आहे. ‘दादा फार कधी बोलले नाहीत, त्यांनी काम केलं. आता भाजपला पर्यायाची गरज आहे,’ अशी चर्चा सुरू झाल्यानंतर ‘तुम्ही थांबा,’ असं कुणी म्हणण्याआधी त्यांनी स्वतः निर्णय घेत निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. दादांचं राजकारणात येणं, हा धक्का होता, आज थांबणं हाही धक्काच आहे.