

Corruption in Sangli municipal administration
esakal
Corruption In Sangli Municipal Corporations : ...अखेर ज्याची प्रतीक्षा होती ती घटिका जवळ आली..., गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कारभाऱ्यांची टोळी जागी झाली..., काही जुनेच ठाण मांडून असले तरी काही नवे पण घोड्यावर स्वार होऊन येतील..., लोकशाहीचा दरबार आता उसळतोय, कोटीच्या कोटी उड्डाणे..., धाब्यावरील तांबड्या-पांढऱ्याची रसभरीत जेवणे..., यामुळे काहींची चंगळ होणार असली तरी या सर्व बाजारांतून ‘सुटेबल’ कारभारी निवडणे ही जनतेसाठी नक्कीच कसोटी आहे. या महापालिकेचा तीन दशकांचा प्रवास पाहिला तर काही अपवाद वगळता ‘सब घोडे बारा टक्के’ असा निराशेच्या खोल खोल खड्ड्यांनी भरलेला आहे.