

vishwajeet kadam and vishal patil sangli
esakal
Sangli local politics update : काँग्रेसने नाट्यमय घडामोडीत भाजपला धक्का देत अनपेक्षितरीत्या मिरज पंचायत समितीचे सभापतिपद पटकावले. त्यामुळे जिल्ह्यातील दहांपैकी सर्वाधिक तीन पंचायत समित्यांचे सभापतिपद मिळवत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांनी अपेक्षेप्रमाणे प्रत्येकी दोन सभापतिपदे मिळवली; तर भाजपला केवळ जतच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले. मिरज वगळता सर्व तालुक्यात सभापती, उपसभापती निवड बिनविरोध झाल्या.