सांगली : ‘‘खासदार विशाल पाटील (Vishal Patil) सांगली लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पक्षांचे ऑफर येत राहणार. कुठे जायचे, काय करायचे, हे त्यांनी ठरावयचे आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.