
सांगली : गेली दीड वर्षे कडधान्यांचे दर तेजीत होते. मात्र, केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे आगामी सहा महिन्यांत कडधान्य ग्राहकांना स्वस्त राहण्याची शक्यता असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. स्थानिक बाजारपठेत या आवक धोरणाचा किती परिणाम राहील, हे येत्या काळात समजेल.